शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

प्रत्येक विवाहित पुरुषाने लक्षांत घ्यावे, असे काही...

..............................
नमुना  संमतिपत्र 

मी, सौ. (लावावे की लावू नये हा जिचा तिचा प्रश्न) _____________________, राहणार______________________श्री./मिस्टर _________________ यांची कायदेशीर पत्नी पूर्ण शुद्धीत व कोणत्याही आणि कुणाच्याही दबावाखाली न येता लिहून देत आहे की, मी आज ____वार दि. ________ रोजी सकाळी/दिवसा/संध्याकाळी/रात्री अगर कुठल्याही वेळी घरी/घराच्या बाहेर कुठल्याही स्थानी माझा कायदेशीर पती श्री./मिस्टर________________________याच्यासोबत शारीरिक संबंध (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) प्रस्थापित करण्यास स्वखुशीने तयार आहे व तशी संमती देत आहे. त्यामुळे, उपरोल्लेखीत समय आणि स्थान यांना अनुसरून होणारा शारीरिक संबंध (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) याला ‘वैवाहिक बलात्कार (साध्या मराठीत मेरिटल रेप) धरू नये. या शारीरिक संबंधांतून (साध्या मराठीत सेक्श्युअल रिलेशन) माझे ठिकाणी गर्भधारणा झाल्यास ती मला मान्य आहे व पुढेही असेल. कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय वैवाहिक बलात्कार व इतर कारणांमुळे गर्भपातास माझी मनाई आहे व असेल. हे संमतिपत्र पुढील _______महिन्या/महिन्यांसाठी वैध असेल. 

वेळ : 
स्थान : 
पूर्ण नाव : 
स्वाक्षरी : 

 (आधार कार्ड, विवाह नोंदणीची प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच या संमतिपत्राचे नोटरायझेशन होणे आवश्यक आहे.) 
-------------------------------------------- 

हा संमतिपत्राचा नमुना पाहून आपणास आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पण, विवाह झालेल्या व करू इच्छिणार्‍या होतकरूंसाठी या नमुन्याची व त्याचे नोटरायझेशन करण्याची नितांत आवश्यकता भासणार आहे. स्त्रीला पायदळी तुडवण्याची व तिच्याकडे केवळ भोगदासी म्हणून पाहण्याची हिंदू परंपरा असलेल्या भारतात आता अनेक ‘हारवर्डी’ सुधारणा येऊ घातल्या आहेत. गर्भपातासाठी विवाहित आणि अविवाहित असा भेदभाव करता येणार नाही, असे विधान (हे निकालपत्रात का करत नाहीत देव जाणे!) सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल देताना केले आहे. 

अविवाहित स्त्रीवर बलात्कार झाल्यास गर्भपाताचा अधिकार तिला असणे पूर्णपणे न्याय्य व मानवी मूल्यांना धरून आहे. पण, विवाहित स्त्रीला तिच्या कायदेशीर नवर्‍याचे मत अजिबात विचारांत न घेता गर्भपात करू देणे कितपत न्याय्य व मानवी मूल्यांना धरून आहे? घटनात्मक अधिकार फक्त स्त्री असलेल्या नागरिकालाच कसे असतात? त्यातही ‘वैवाहिक बलात्कार’ ठरवायचा कसा हा वेगळाच मुद्दा आहे. त्यातही तिची संमती (साध्या मराठीत कन्सेन्सस) किंवा संमती नसणे (साध्या मराठीत नॉन-कन्सेन्सस) हा अधिकारही तिलाच बहाल केला जातो. पुरुषाने सिद्ध करावे की, तिची संमती होती की, नव्हती. 

यामागे एक मूळ विचार रुजवला जात आहे, जो घातक आहे. ‘पुरुष हा कायम स्त्रीवर अत्याचारच करतो.’ हा तो विचार. एका बाजूने स्त्री-पुरुष समानतेचा उद्घोष उच्चरवाने करायचा आणि दुसर्‍या बाजूने स्त्री ही दुबळी म्हणून पीडित आहे, असेही म्हणायचे. मुळात स्त्री व पुरुष हे समान नाहीत. त्यांना समान करायलाही जायचे नसते. तो एक वेगळा विषय आहे, पण या सगळ्या विचारांच्या मांडणीमागे हॉर्वर्ड विश्वविद्यालयातील ‘जागृत संस्कृती’ (साध्या मराठीत व्होक कल्चर) जबाबदार आहे. अनेक भारतीय विद्वान, समाजशास्त्रज्ञ हे तिथूनच विद्या ग्रहण करून येत असल्यामुळे ते विचार येथेही तसेच्या तसे बिंबवले जातात. हे म्हणजे नऊवारी नेसलेल्या संस्कृतीवर जीन्स चढवण्यासारखे आहे!

विवाह आपल्याकडे संस्कार आहे, करार नव्हे. प्रजननाचा निसर्गधर्म म्हणून विवाहात परस्पर शारीरिक संबंध अनुस्यूत (साध्या मराठीत इन्क्लुझिव्ह) आहे, हे दोघांनाही माहीत असते. त्यामुळे, शारीरिक संबंधांसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नसते. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकामुळे व व्होक संस्कृतीच्या प्रभावामुळे स्त्रीला एकांगी, झुकते माप देणे चुकीचे आहे. विवाह व कुटुंबसंस्थेचा मूळ हेतूच यामुळे बिघडून जाईल. उत्तम प्रजा (पोरे जन्माला घालणे नव्हे) निर्माण करण्यासाठी नारायणरूपी पुरुष व लक्ष्मीरूपी स्त्री एक संस्कार आपल्यावर करून घेतात ज्याला विवाह म्हटले जाते. ग्रामीण भागांत ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’, असे दांपत्याला म्हटले जाते, त्यामागेही हीच संकल्पना आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विवाह ही शारीरिक संबंधांसाठी निर्माण केलेली सोय आहे. म्हणूनच तिथे कुटुंबसंस्था नावाची संकल्पना नाही. संत व्हेलेंटाइनपासून आत्ताच्या हॉलिवूड चित्रपटांपर्यंत कौटुंबिक मूल्यांचा (साध्या मराठीत फॅमिली व्हॅल्यू) गजर केला जातो. त्यांची ती जागृत (?) कौटुंबिक मूल्य आम्ही का स्वीकारावीत, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. तिथे स्त्रियांना अधिकार नव्हते म्हणून चळवळी, आंदोलने झाली. जिथे घटनेने समान अधिकार दिलेले असतानाही केवळ स्त्रियांचीच बाजू घेतील असे कायदे कशासाठी? शरियात सांगितले आहे म्हणून, ‘मुलीला न्हाणं येणं किंवा पंधरा वर्षे होणे (दोन्हीपैकी एक)’ हे लग्नाचे वय म्हणून कायदा व राज्यघटना कशी मान्य करते? तेव्हा हे स्त्रीवादी व व्होक संस्कृतीवाले कुठे लपून बसतात?


जगभर असलेल्या निसर्गपूजक संस्कृतींना या व्होक संस्कृतीने संपवल्यानंतर त्या संस्कृतीची जागा स्वभावत:च कट्टर असलेल्या अब्रह्मिक संस्कृतींनी घेतली आहे. आता युरोपात इस्लामिक संस्था आणि व्होक संस्कृती हातात हात घालून ख्रिश्चन संस्कृतीला ग्रासत आहेत. या भयापोटीच इटलीमध्ये ‘देव, देश आणि कुटुंब’, अशी घोषणा व विचार मांडणारे जॉर्जिया मेलोनी यांचे सरकार येऊ घातले आहे. त्याचा मुसोलिनीच्या फॅसिझम व पर्यायाने मोदींशी संबंध आपल्याकडच्या विचारवंतांनी लावणे स्वाभाविक आहे. आपल्याकडची उरलीसुरली कुटुंबव्यवस्था संपवण्यासाठीच ही हॉर्वर्डी पिल्ले सोडली जात आहेत. आपल्याकडे स्त्री विरुद्ध पुरुष किंवा स्त्री-पुरुष समानता नाही. आपल्याकडे स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आहेत. स्त्री व पुरुष दोघेही निसर्गचक्राच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यातही सांगायचेच झाले तर स्त्री पुरुषापेक्षाही काकणभर सरसच आहे!

७ टिप्पण्या:

  1. अरे बापरे. भयानक आहे हे

    उत्तर द्याहटवा
  2. अशी पाळी कुणावरही न येवो

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या देशात अतिरेक्यांना तसेच जनावरांना सुद्धा हक्क व अधिकार आहेत नाहीत ते सामान्य नागरिकांना. नऊवारीवर जिन्स सहज चढते म्हणून चढवली जातेय.

    उत्तर द्याहटवा
  4. आपली कुटुंबव्यवस्था ईतकी तकलादू आहे का ?
    नक्कीच नाही.
    मग हे निरर्थक उपद्व्याप काय कामाचे .

    उत्तर द्याहटवा
  5. नक्कीच आपली कुटुंबव्यवस्था तकलादू नाही. पण अनेक बुसरटलेल्या पाश्चिमात्य विचारसरणीची वाळवी आपल्याही कुटुंबांना पोखरत आहे. उदाहरणार्थ *लिव इन रिलेशनशिप* . म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय हे लक्षात घेतले पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  6. आपली कुटुबवयवसथा तकलादू नाही परंतु ती उसना आव आणून पाश्चात्य ऊषटावळणीची झाली आहे धड इकडे ना तिकडे अशा कातरीत आजची पिढी सापडली आहे

    उत्तर द्याहटवा
  7. विनयभंग कायदा पण तसाच असतो. कार्यालयात एक कामचुकार महिलेवर कसलीच कारवाई करायला मिळत नाही. कारण विनयभंगाची तक्रार ती सहज करू शकते.
    निकाल काहीही येवो, साहेबाच्या प्रतिष्ठेचं पूर्वी खोबरे होऊन जाते. त्याशिवाय शिस्तभंगाची कारवाई आणि बडतर्फी.

    उत्तर द्याहटवा