सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

शिवाजी महाराजांचा अपमान कशात आहे?

-----------------

-कोश्यारींचे हिंदी भाषण-

पहले भी इन्हे डिलिट दे चुका हूं। अब दो और युनिव्हर्सिटी के पेंडिंग पडे हैं। वह कहते हैं इन्हीको देना चाहते हैं। मैने कहा कोई और नही है क्या? हमारे दो लोगोंकोही क्यों देते हो। कुछ तो खास बात हैही है। अब इतना इनके बारे मे क्यों बोल रहां हूं क्यों के यह हमारे सामने हैं। हमारे लिए एक्जांपूल हैं, उदाहरण हैं। हम जब पढते थे, मिडल मे हायस्कूल मे, तो हमारे टीचर हमको वो देते थे, हू इज युवर फेवरेट हीरो? ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है? तो हम उस समय जिनको सुभाषचंद्र बोस अच्छे लगे, जिनको नेहरू अच्छे लगे, जिनको गांधीजी अच्छे लगे । तो मुझे ऐसा लगता है के हू इज युवर आयकॉन? हू इज युवर फेवरेट हीरो? तो बाहर जाने की कोई जरूरत  नही है। यहीं महाराष्ट्रमेही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बातहैं, मै नये युग की बात बोल रहां हूं। डॉक्टर आंबेडकर से लेकर डॉ. गडकरी तक, नितीन गडकरी तक सब आपको यंही मिल जाएंगे।

--------------

- मराठी अनुवाद -

जेव्हा आम्ही लहान होतो आणि शाळेत जायचो तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचे आवडते नेते कोण आहे, तेव्हा कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी,  तर कुणी नेहरू असे सांगायचे. मला असे वाटते जर कुणी तुम्हाला विचारले तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहे, तर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. पूर्वीच्या काळातील आदर्श शिवाजी महाराज आहेत. परंतु, जर नव्या काळातील आदर्श शोधायचे झाल्यास डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरी तुम्हाला इथेच मिळतील.

----------------

यात शिवाजी महाराजांचा अपमान कुठे झाला? उलट नव्या पिढीला शिवाजी महाराजांनंतर कुणी आदर्श नेताच नाही मिळाला, असे म्हणणे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांच्या उंचीचे आणि कर्तृत्वाचे नेतृत्व नसूनही औरंगजेबाला एकही किल्ला घेता आला नाही, हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे यश आहे. जुन्या काळचे आदर्श म्हटले म्हणून शिवाजी महाराज कालबाह्य होत नाहीत. आदर्श वाटावेत असे नवीन नेते निर्माण होणे यातच त्या पूर्वीच्या नेत्यांचे यश आहे. 

आता शिवाजी महाराजांच्या आदर्शाची तुलना शरद पवार व नितीन गडगरी यांच्या आदर्शाशी करावी का, हा खरा वादाचा मुद्दा आहे. ‘शिवाजी कोण होता?’ असा एकेरी उल्लेख पुस्तकाच्या नावात असणे, पवारांना जाणता राजा म्हणणे, पवारांनी शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नये, असे म्हणणे यात शिवाजी महाराजांचा अपमान कुठेच, कुणालाच दिसत नाही का? 

अभिमानाचे आणि अपमानाचे वर्गीकरण ‘टोकाची अस्मिता’ या निकषावर करणे, वक्ता किंवा लेखक कोण आहे, कोणत्या विचारधारेचा आहे, यावर करणे अयोग्य आहे. कोश्यारींचे पूर्ण भाषण ऐकले असते, तर कदाचित त्यावर दिवसभर चर्चा पेटवणे, अग्रलेख खरडणे किती अप्रस्तुत आहे, हे लक्षात आले असते. पत्रकार हा शेवटी कुठल्या तरी बाजूचा असावा लागतो, तरच जयजयकार होतो. सत्य, योग्य भूमिका, खर्‍याला खरे म्हणणे व खोट्याला खोटे म्हणणे यापेक्षाही सोयीचे तेवढेच पाहणे म्हणजे पत्रकारिता...


६ टिप्पण्या:

  1. असले उद्योग मीडियावाले ठरवून करतात.

    उत्तर द्याहटवा
  2. शरद पवार यांना जाणता राजा म्हणणे यात शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अपमान आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. फारच समर्पक असा श्री कोशारींच्या भाषणाचा अर्थ सांगितलास. उगाच रान पेटविलें गेलेय असे मलाही वाटते्...ज्ञानेश्वर मांद्रेकर

    उत्तर द्याहटवा
  4. महाराजांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख करणे माझ्या मते चुकीचे आहे

    उत्तर द्याहटवा