चित्रपट आपण ‘हॉरर’ या सदरात रूढार्थाने खरे तर येत नाही. हा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे. यातले कथानक सांगणे म्हणजे त्यातले थ्रिल घालवणे. बारामुल्ला येथे अपहृत मुलांचे प्रकरण सोडवण्यासाठी आलेला पोलीस उपअधीक्षक रिदवान सय्यद एका घरात राहतो. सोबत पत्नी गुलनार, मुलगी नूरी आणि मुलगा अयान. मुलांचे अपहरण नेमके कोण करते, ती अचानक गायब कशी होतात, कशा पद्धतीने दहशतवाद आपली पाळेमुळे फार पूर्वीपासून फैलावत आलाय ही बाब आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विश्वासघाताची न भरलेली जखम, आपल्याला अस्वस्थ करते. हळूहळू उलगडत जाणारा हा सिनेमा खूप काही गोष्टी सांगून जातो. अक्षरश: मनावर बिंबवत जातो. त्यात कवड्या खेळण्याचा एक संदर्भ आहे, ज्याचे एक टोक अगदी शेवटच्या सीनमध्ये उलगडते. तिथे संवाद नाहीत, फक्त कॅमेरा बोलतो. चित्रपटाचा शेवट नावाच्या पाटीवर येऊन कॅमेरा स्थिरावल्यावर होतो आणि ब्लॅक आउट होऊन दिग्दर्शकाचे नाव झळकते. चित्रपट हे कॅमेऱ्याला बोलते करणाऱ्या दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे आदित्य सुहास जांभळे यांनी सार्थ करून दाखवले आहे!
चित्रपटातील प्रत्येकाच्या भूमिका छान झाल्या आहेत. पटकथा बंदिस्त आहे. काही नगण्य चुका आहेत, त्या सांगू गेल्यास रहस्योद्घाटन करावे लागेल. हा चित्रपट जाणिवेने बघण्याचा चित्रपट आहे, तो तसाच सर्वांनी पाहावा. कथा, पटकथा, प्रसंग, संदर्भ सगळे काही बारकाईने पाहणे अत्यावश्यक आहे; खास करून ते फूल, केस कापणे आणि कवड्या खेळणे!
वपुंच्या ‘बदली’ या कथेतला जनार्दन एकबोटे दामलेंना म्हणतो, ‘जिवंतपणी माणसावर जे संस्कार झालेले असतात, ते मेल्यावरसुद्धा माणसाची पाठ सोडत नाहीत!’ पण, केवळ संस्कारच नव्हे तर झालेले आघात, विश्वासघात आणि अन्यायही आपली पाठ सोडत नाहीत.
‘खूप कालावधी लोटला’, या सबबीखाली साधी सुनावणीही नाकारणाऱ्या व ‘इथे जा, तिथे जा’ सांगणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाने हा चित्रपट पाहावा. स्वत:ला न्यायाधीश म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक निर्लज्ज व्यक्तीने तो पाहावा. काश्मीरमध्ये हिंदूंच्या नरसंहाराचे जे जिवंत साक्षीदार आहेत, त्यांच्या निदान साक्षी तरी नोंदवून घ्या. अन्यथा स्वत:स न्यायाधीश म्हणवून घेणे तरी बंद करा. त्यावेळेस भारतभर इतरत्र कवड्या खेळत बसलेल्या समस्त हिंदूंनी आवाज उठवला असता तर कदाचित न्याय झाला असता.
गळ्यात कवड्यांची माळ घालून बेल-भंडारा उधळत वेळ राहताच अन्यायाचे परिमार्जन केल्यासच ते होते. वेळ निघून गेली, की त्यास कवडीइतकेही मोल राहत नाही. राहिल्या तर राहतील फक्त कथा, पटकथा, चित्रपट आणि वाट बघणे; कुणी तरी कुठल्या तरी डॉ. सप्रूला खेळातल्या कवड्या पोहोचवेल याची!

after long time. gud. watched movie. your review and movie both are the best.
उत्तर द्याहटवाखुप छान!वास्तव ,परखड शब्दांकन
उत्तर द्याहटवाhttps://x.com/Karmickonnecti1/status/1351551944309948417?s=20
उत्तर द्याहटवा