‘ब्राह्मणी’ (Brahmanical) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
‘ब्राह्मणी’ (Brahmanical) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

सरकार विद्यार्थ्यांना जातीयवादी बनवत आहे!

आता कुणी जातिभेदाच्या, उच्चनीचतेच्या गप्पा हाणू लागले, की त्याला ‘हा अभ्यासक्रम वेगळे काय करत आहे’, हा प्रश्‍न विचारावाच लागेल. सरकार, शिक्षण खाते आणि एनसीईआरटी विद्यार्थ्यांना जातीयवादी बनवत आहे.   गुणवत्ता, जनरल कॅटगरी आणि ब्राह्मण नष्ट झाल्यानंतर पुढे काय, हा खरा प्रश्‍न आहे. भारताचे शिक्षणखाते त्याचीच पायाभरणी करीत आहे!

विद्यार्थ्यांना जातीयवादी बनवणे हे भारत सरकारचे शैक्षणिक धोरण आहे. गेल्या सहा दशकांत हिंदू धर्माला व संस्कृतीला हीन दाखवून झाले. त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यामुळे, ‘ब्राह्मण’ हे नवे शैक्षणिक हत्यार उपसले आहे. त्याचे परिणाम काय होतील, याची कुणासही पर्वा नाही. 

एनसीईआरटी तेच कार्य करत आहे. इयत्ता बारावी, इतिहास, भाग १, प्रकरण ३, ‘नातेसंबंध, जात आणि वर्ग: प्रारंभिक समाज’ (Themes in Indian History – Part I, Theme 3: “Kinship, Caste and Class: Early Societies) हा धडा पान क्र. ५३ ते ८१ पानांपर्यंत आहे. जवळपास २८ पानांच्या या प्रकरणामध्ये ‘ब्राह्मण’ (Brahmana/Brahmanas) हा शब्द ३७वेळा आणि ‘ब्राह्मणी’ (Brahmanical) हा शब्द १७वेळा आलेला आहे. हिंदू हा शब्द फक्त एकदाच आला आहे आणि तोही एका नकारात्मक अर्थाने आला आहे. कुराण, बायबल या ग्रंथांना न चुकता ‘पवित्र’ म्हणणार्‍या शालेय अभ्यासक्रमाने ज्या ग्रंथांचा आधार घेतला आहे, त्या हिंदू ग्रंथांना एकदाही ‘पवित्र’ म्हटले नाही. 

हिंदू ग्रंथसाहित्यास वारंवार ‘ब्राह्मणी’ म्हणून वर्णन केल्याचा परिणाम तरुण विद्यार्थ्यांवर काय होईल याचा विचार अभ्यासक्रम लिहिणारे व सरकार अजिबात करत नाही. संपूर्ण हिंदूंच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक वारशाचा भाग असलेले ग्रंथ ब्राह्मणांच्या मालकीचे आहेत, असा गैरसमज दृढ होईल.  भारतातील बौद्धिक परंपरांशी जोडलेले अनेक ऋषी आणि गुरू, समाजाच्या विविध स्तरातून आले होते, हा भागच डावलला जाईल. सर्वांत घातक गोष्ट म्हणजे पूर्वजांची सामूहिक समज, ज्ञान, आणि ग्रंथ यांपासून विद्यार्थ्यांची होणारी फारकत. एकदा ती झाली, की ते आपल्या वारशाचे नकारात्मक चित्रण करणार्‍या विचारसरणीला सहज बळी पडतात. 

या ग्रंथांच्या लेखकांनी, ऋषींनी त्यांच्या स्वतःच्या साहित्याचे वर्णन ‘ब्राह्मणी’ असे केले नाही; तरीही एनसीआरटी आणि पाठ्यपुस्तके कोणत्या आधारावर या ग्रंथांना ‘ब्राह्मणी’ म्हणत आहे? एनसीईआरटी एक शक्तिशाली मार्क्सवादी-मिशनरि शैलीतील हत्यार वापरत आहे. संस्कृती नष्ट करण्यासाठी प्रथम भाषा आणि सामूहिक स्मृती नष्ट करण्याचे हे काम जोरात सुरू आहे. याकडे सरकारने पूर्णपणे डोळेझाक केली आहे. शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे काय चाटायचे आहेत? प्रधान गेले जोशी आले. पुस्तके जातीयवाद शिकवतच आहेत. 

यातून पुढील पन्नास वर्षांत काय होईल ते सांगायला कुणीही भविष्यवेत्त्याची गरज नाही. ‘ब्राह्मणांचा नरसंहार करा’, असे आवाहन बहुजनांना करूनही त्यांनी तो केला नाही म्हणून न्यायालयाने खेडेकरांना निर्दोष मुक्त केले होते. अभ्यासक्रम त्यांचेच हे कार्य हळुवार पद्धतीने करत आहे. 

आता कुणी जातिभेदाच्या, उच्चनीचतेच्या गप्पा हाणू लागले, की त्याला ‘हा अभ्यासक्रम वेगळे काय करत आहे’, हा प्रश्‍न विचारावाच लागेल. सरकार, शिक्षण खाते आणि एनसीईआरटी विद्यार्थ्यांना जातीयवादी बनवत आहे.   गुणवत्ता, जनरल कॅटगरी आणि ब्राह्मण नष्ट झाल्यानंतर पुढे काय, हा खरा प्रश्‍न आहे. भारताचे शिक्षणखाते त्याचीच पायाभरणी करीत आहे!