गुरुवार, १८ जून, २०२६

हिंदू बहुत ही डरपोक कौम है!

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही!

'सत्य हिंदी' या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'बात बोलेगी' या कार्यक्रमात "हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए?"   या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश कुमार सिंग यांनी 

प्रख्यात विचारवंत, लेखक, सामाजिक विश्लेषक आणि दिल्ली विद्यापीठातील हिंदीचे प्राध्यापक अपूर्वानंद झा यांची मुलाखत घेतली आहे.  यात अपूर्वानंद झा म्हणाले, 

“हिंदूंना इतके कट्टर झाले आहेत,  की हिंदूंच्या प्रत्येक घरातील हिंदू हा संभाव्य खुनी किंवा संभाव्य बलात्कारी आहे. प्रत्येक हिंदू प्रत्यक्षात किंवा स्वप्नांत एखाद्या मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करत असतो. आणि याला उचित मानले जाते. ”

मुकेश कुमार सिंग व अपूर्वानंद झा हे दोघेही डाव्या विचारांचे उदारमतवादी (हाही एक विनोदच आहे) आहेत. प्रतिकार करणारा हिंदू यांना कधीच नको. इतिहासातही जिथे जिथे प्रतिकार केला तिथे तिथे सुरुवात कुणी केली व प्रतिकार केलाच नसता तर काय झाले असते, हे कधी सांगितलेच जात नाही.  प्रतिकार केला नाही, तर "हिंदूंचा नरसंहार" असा शब्द वापरत नाहीत व केलाच "जातीय दंगली" असा शब्द वापरला जातो. 

नौखालीचा व काश्मीरचा हिंदू नरसंहार झाला कारण हिंदूंनी प्रतिकारच केला नाही! परिणामी नरसंहार व जीव वाचवण्यासाठी पलायन झाले. नौखालीत तर नोव्हेंबर १९४६ ते मार्च १९४७ या काळात गांधीजी उपस्थित असताना  हिंदूंचा नरसंहार झाला आहे. तो एकतर्फी असल्याने त्याला "जातीय दंगली" म्हणता येत नव्हते म्हणून इतिहासाच्या पुस्तकातून दाबून टाकण्यात आले. पाठ्यपुस्तकातही आले नाही व कधी शिकवलेच नाही. तिथे त्यावेळेस मुस्लीम जमावाने केलेल्या बलात्कारातून गरोदर राहिलेल्या महिलांना अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा सल्ला देताना गांधीजी म्हणाले,  

"जर एखाद्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग आला आणि ती स्वतःचा बचाव करू शकत नसेल, तर तिने दात आणि ओठ घट्ट दाबून मृत्यू पत्करावा" 

असा सल्ला देणारे गांधी त्यानंतर दिल्लीत झालेल्या प्रार्थनासभेत म्हणाले, 

"जर मुसलमानांनी सर्व हिंदूंना मारून टाकले, तरी हिंदूंनी हिंसेचा मार्ग पत्करू नये, तर शांतपणे मृत्यूला सामोरे जावे. जर त्यांनी असे केले, तर हिंदू धर्म अमर होईल आणि त्या बलिदानातून आपण एका नव्या भारताचा किंवा नव्या विश्वाचा उदय पाहू."

प्रत्येक हिंदू घरातील हिंदू कधीच हिंसक नव्हता व होणारही नाही. तो फार तर आपल्याच भावकीत कोर्टाच्या पायर्‍या झिजवून  वकिलांचे बंगले उभारण्यास मदत करेल. म्हणूनच "प्रत्येक हिंदू हिंसक, बलात्कारी झाला आहे" हे विधान राजकीय आणि इस्लामी कट्टरतेला, दहशतवादाला कव्हर देणारे संरक्षक कवच आहे. याविरुद्ध कुणी बोलणार नाही व त्याविरुद्ध काहीही होणार नाही. उलट, झुंडशाही सक्रिय होईल. मनुवादी, संघोटे, अंधभक्त वगैरे म्हणत हल्ला एक झुंड करेल व दुसरी झुंड मुस्लीम लांगूलचालन करणारे, गुलाम वगैरे म्हणत प्रतिहल्ला चढवेल. मूळ मुद्दा बाजूलाच राहील. जसा प्रत्येक हिंदू हिंसक व बलात्कारी नाही, तसाच प्रत्येक मुसलमान व ख्रिश्चनही नाही. तरीही हे नरसंहार का घडले, हा मूळ प्रश्नच बाजूला पडत आहे. ते घडले, घडत आहेत व घडत राहतील, म्हणून हिंदूंनी मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा द्वेष करणे चुकीचे आहे. तसेच यामागचे मूळ कारण व भेद लक्षांत न घेता राज्यघटनेने सर्व पंथीयांना प्रचार व प्रसाराचा समान घटनात्मक अधिकार देणेही चुकीचेच आहे. वास्तविक प्रत्येक पंथ आणि राज्यव्यवस्था यांचा काही संबंध नसणे ही इहवादी भूमिका सोडून भारताने प्रत्येक पंथाला चुचकारणारी "सेक्युलर" व समाजवादी विचारसरणी स्वीकारली. सांस्कृतिक मार्क्सवादाला शिक्षण क्षेत्रावर अनिर्बंध सत्ता गाजवू दिली. 

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा