सोमवार, २९ जून, २०२६

सिटिझन व्हिजिलान्टे : न्याय बंदुकीने करावा, की चांगुलपणा जपत त्याची वाट पाहावी?

काश्मीरमध्ये हिंदूंना केवळ हिंदू आहेत म्हणून मारण्यात आले, हे सत्य सांगण्याचे धाडस भारतीय लोकशाहीचा एकही स्तंभ करू शकत नाही. का? याचे एकमेव कारण संपूर्ण लोकशाही इस्लामला चळचळा कापते.  स्वत:च्या संस्कृतीचे नाणे राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात ठणकावून वाजवावे लागते. अन्यथा, नौखालीपासून काश्मीरपर्यंत नरसंहार होऊनही जगातील मानवतावादाला त्याचे काहीही सोयरसुतक नसते. ‘व्हिजिलान्टे’प्रमाणे हाती शस्त्र न घेण्याच्या किंवा त्याविरुद्ध व्यक्तही न होण्याच्या  चांगुलपणासही काहीच अर्थ नसतो.

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ चित्रपट पाहिला. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे चित्रपटाचा अनाम नायक(खलनायक), ज्या स्थलांतरितांनी बलात्कार केलेला असतो, त्यांची हत्या करत सुटतो. त्या प्रसंगातील संवाद फार उत्तम व बेधडक आहे.

------------ 

युसुफ: मला माफ करा. आम्ही जे केलं त्यासाठी मला माफ करा. आम्हाला वाटलं की तिचीही इच्छा होती.

अनाम व्यक्ती: तुला वाटलं की... तिची इच्छा होती की तुम्ही तिला पकडावं आणि पार्कमधल्या एका निर्जन ठिकाणी झाडीत ओढत न्यावं? तिची इच्छा होती की तू तिचा तोंड दाबावंस आणि तुझ्या सात मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करावा? या घटनेनंतर तुझ्या सोशल मीडियावर मला कोणताही पश्चात्ताप किंवा सहानुभूती दिसली नाही. उलट, मला वाटतं तू असं लिहिलं होतं की ती बलात्काराच्याच लायकीची होती.

युसुफची बहीण: माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, त्या चुकीचे कपडे घालतात. आणि त्यांच्या मिनी स्कर्ट्समुळे मुलांना आकर्षित करतात. त्या आपले पाय आणि छाती दाखवतात.

अनाम व्यक्ती: तू लिहिलं होतं की ती याच लायकीची होती.

युसुफची बहीण: मी ते डिलीट करेन.

अनाम व्यक्ती (इब्राहिमला): तुम्ही तुमच्या मुलांना हेच संस्कार शिकवत आहात का?

इब्राहिम: मी त्याला कुराणमधील मूल्ये आणि आमच्या कुटुंबाचे संस्कार शिकवतो.

अनाम व्यक्ती: बरं, जर तुमचे संस्कार हेच आहेत-की अमेरिका आणि युरोपमधील महिला कपड्यांच्या पद्धतीमुळे बलात्काराच्या पात्र आहेत-तर मग तुम्ही इथे का आलात?

इब्राहिम: तुम्हाला माहीत आहे की आमच्या देशात गृहयुद्ध सुरू आहे, आणि आमचे जीवन धोक्यात होते. म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. आणि मला वाटतं तुम्हाला हे माहीत आहे.

अनाम व्यक्ती: मला काय वाटतं माहीत आहे? मला नाही वाटत की तुमच्या देशातून चांगले लोक बाहेर पडले. मला वाटतं वाईट लोक बाहेर आले आहेत. आणि मला वाटतं तुम्ही तुमच्यासोबत तुमची जुनाट विचारसरणी आणि लोकशाही किंवा कायद्याच्या राज्यापेक्षा रिलिजनला वरचढ मानण्याची वृत्ती सोबत घेऊन आला आहात.

---------------

यानंतर ती अनाम व्यक्ती, युसूफसह सर्वांना गोळ्या घालते. 

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ या चित्रपटावर जर्मनीनेे बंदी घातली आहे. अन्य युरोपीय देशही त्याच मार्गावर आहेत. या चित्रपटाची कथा युरोपीय देशांत निर्वासित म्हणून आश्रय घेतलेल्या इस्लामी लोकांनी सुरू केलेले अत्याचार व त्यांची तेथील न्यायव्यवस्थेने, प्रशासनाने केलेली पाठराखण यातून निर्माण झालेल्या असंतोषावर आधारित आहे. यात अनाम नायक या सर्व गुन्हे, बलात्कार केलेल्या निर्वासितांना मारीत सुटतो. हे कृत्य अयोग्य की योग्य, हा प्रश्‍न विचारणारे इस्लामच्या नावे केलेले अत्याचार व ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’ (निर्वासित व्हावे लागल्याचा आघात झाल्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे) या सबबीखाली गुन्हेगार सुटतात त्यावर अवाक्षरही काढीत नाहीत. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे; पण जिथे ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’ या नावाखाली बलात्कार करण्याचे समर्थन न्यायालयच करते, तिथे कायद्याला अर्थ काय उरतो? ‘सिटिझन व्हिजिलान्टे’ जशी हाती बंदुक घेतो, तशी काश्मिरी हिंदूंनी घेतली नाही हे त्यांचे चुकले का? 

जे आज युरोप व पाश्चिमात्त्य देश भोगत आहेत, ते भारताने हजारो वर्षे भोगले आहे. त्याला ‘मध्ययुगीन मानसिकता’ म्हणून झाकले गेले व तेच जेव्हा स्वतंत्र भारतात अनेकदा घडले तेव्हा न्यायव्यवस्थेने ‘खूप काळ लोटल्याचे’ तकलादू कारण पुढे करत त्याची सुनावणीच नाकारली. भारत आज ‘मिश्र संस्कृती’चा देश म्हणून समाजवादी, साम्यवादी मिरवतात; पण, आज जे पाश्चिमात्त्य देशांत सुरू आहे ती याचीच सुरुवात आहे. पुढे या गोष्टी सामान्य झाल्या की मिश्र संस्कृती म्हणून जगण्याशिवाय युरोपीय देशांकडे पर्याय उरणार नाही. जे वसाहतवाद्यांनी भारतात केले व साम्यवादी-समाजवादी विचारसरणीने पांघरूण घातले, तेच भोगावे लागणे हा ‘काव्यात्म न्याय’ (पोएटिक जस्टिस) आहे.

निर्वासितांनी केवळ इस्लाममध्ये म्हटले आहे म्हणून बलात्कार केल्याचे सत्य अक्षरश: लोकशाहीच्या सर्व स्तंभ युरोपमध्ये झाकत आहेत. चौदा जणांनी नवर्‍याच्या डोळ्यांसमोर बलात्कार केल्यानंतरही तिच्या दुर्दैवाने जिवंत राहिलेल्या गिरिजा टिक्कूचा जिवंत देह करवतीने चिरण्यात आला होता. तिला आजवर साधा नैसर्गिक न्यायही मिळाला नाही. एकाही काश्मिरी हिंदूने या अत्याचाराच्या बदल्यात बंदूक उचलली नाही. पण, त्यांचे कुणालाही काही पडलेले नाही. युरोपमध्ये इस्लाममुळे होणार्‍या बलात्कारांना ‘सिटिझन व्हिजिलान्टे’ने बंदुकीतून दिलेल्या उत्तराचे कौतुक आम्ही तरी का करावे? त्यांच्या न्यायव्यवस्थेला ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’मुळे बलात्कार करणे सामान्य व समर्थनीय वाटत असेल तर त्याचे दु:ख जगात कुणीच करू नये. जे ‘व्हिजिलांटे’च्या कायदा हातात घेण्याला विरोध करतात, ते केलेल्या बलात्कारातून ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’मुळे सुटलेल्या इस्लामी निर्वासितांचा विरोध व त्यांना शिक्षा करण्याबद्दल काहीही बोलत नाहीत. म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय त्याने शांत राहावे. हा एका अर्थाने युरोपने बलात्कार करण्यास दिलेला परवानाच आहे.

स्वत:स ‘इस्लामोफोबिक’ ठरवले जाण्याची भीती प्रत्येक युरोपीय देशास आहे. पण, त्यासाठी गुन्हेगारीस पाठीशी घालावे का, याचे उत्तर एकाही देशाकडे नाही. एवढे इस्लामिक देश असतानाही, सगळे मुस्लीम निर्वासित उदारमतवादी युरोपीय देशांतच का जातात, याचा विचारही त्यांना शिवत नाही. ‘व्हिजिलान्टे’पद्धतीने कायदा हाती घेण्याची बळावत चाललेली वृत्तीही युरोपीय देशांनी स्वत:हून ओढवून घेतलेली आहे.  

काश्मीरमध्ये हिंदूंना केवळ हिंदू आहेत म्हणून मारण्यात आले, हे सत्य सांगण्याचे धाडस भारतीय लोकशाहीचा एकही स्तंभ करू शकत नाही. का? याचे एकमेव कारण संपूर्ण लोकशाही इस्लामला चळचळा कापते.

स्वत:च्या संस्कृतीचे नाणे राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात ठणकावून वाजवावे लागते. अन्यथा, नौखालीपासून काश्मीरपर्यंत नरसंहार होऊनही जगातील मानवतावादाला त्याचे काहीही सोयरसुतक नसते. ‘व्हिजिलान्टे’प्रमाणे हाती शस्त्र न घेण्याच्या किंवा त्याविरुद्ध व्यक्तही न होण्याच्या  चांगुलपणासही काहीच अर्थ नसतो. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा