शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

गोव्यातली गणेशचतुर्थी आणि संस्कृती

आज आपल्याला ख्रिश्‍चनिटीने हिंदू सण संपवले, असे म्हणण्याचे साधे धाडसही होत नाही. त्याऐवजी ‘पोर्तुगीज राजवट’, अशी बचावात्मक बाजू आपण घेतो. का? एक वैचारिक भीती आपल्यात रुजवली गेली आहे. ‘ख्रिश्‍चनांना काय वाटेल?’, ‘सामाजिक सलोखा बिघडेल’, ‘समाजात द्वेष पसरेल’ हे विचार मुद्दाम पेरण्यात आले. ते वाढवत ठेवले. आज जे ख्रिश्‍चन आहेत त्यांचीही हीच संस्कृती आहे, हे सांगण्याचे धाडस कुणी करत नाही. ख्रिश्‍चनिटीने गोव्यातील हिंदूंवर अमानुष अत्याचार केले, असे म्हटल्याने त्याचा दोष आजच्या ख्रिश्‍चनांवर येत नाही. कुणीही त्यांना त्यासाठी जबाबदार धरत नाही.
गोव्यातल्या गणेशचतुर्थीला खूप जुनी परंपरा आहे. आमच्या पूर्वजांनी ती टिकवून ठेवली. अत्यंत हालअपेष्टा सहन करत ती टिकवून ठेवली. का? कारण, तो आमचा सांस्कृतिक वारसा आहे जो संपूर्ण गावाला एकत्र जोडून ठेवतो!

गणेशचतुर्थीच्या सणात जे आपण उगवतो ते वापरण्याची आणि जे नाही ते सामाजिक जाणिवेतून वाटून घेण्याची सर्वोत्तम परंपरा आहे. ‘विकत आणणे’ हा भागच पूर्वी नव्हता. त्यामुळे, प्रत्येकाच्या घरातील गणपतीला लोकसहभागाचा थोडा तरी वाटा निश्‍चितच होता. येणेजाणे होते, इतरांच्या आनंदात आपला आनंद मोठा करणे होते. श्रीमंती महत्त्वाची नव्हती, संस्कृती महत्त्वाची होती. अधिकार महत्त्वाचे नव्हते, जबाबदारी महत्त्वाची होती.

पोर्तुगीज राजवटीत यावर पाबंदी आणली गेली. याचे खापर आपण पोर्तुगीज राजवटीवर फोडतो, तेव्हा इतिहासाचे आकलन कमी पडते. त्यामागे असलेला सांस्कृतिक विस्तारवाद लक्षांत नाही घेतला, तर तो वर्तमानातही होतच राहतो. भविष्यही काही वेगळे नसते. आज आपल्याला ख्रिश्‍चनिटीने हिंदू सण संपवले, असे म्हणण्याचे साधे धाडसही होत नाही. त्याऐवजी ‘पोर्तुगीज राजवट’, अशी बचावात्मक बाजू आपण घेतो. का? एक वैचारिक भीती आपल्यात रुजवली गेली आहे. ‘ख्रिश्‍चनांना काय वाटेल?’, ‘सामाजिक सलोखा बिघडेल’, ‘समाजात द्वेष पसरेल’ हे विचार मुद्दाम पेरण्यात आले. ते वाढवत ठेवले. आज जे ख्रिश्‍चन आहेत त्यांचीही हीच संस्कृती आहे, हे सांगण्याचे धाडस कुणी करत नाही. ख्रिश्‍चनिटीने गोव्यातील हिंदूंवर अमानुष अत्याचार केले, असे म्हटल्याने त्याचा दोष आजच्या ख्रिश्‍चनांवर येत नाही. कुणीही त्यांना त्यासाठी जबाबदार धरत नाही. त्यांना ‘शोषक’ म्हणत नाही. ‘सामाजिक न्याय’ या गोंडस नावाखाली नागरिक म्हणून असलेले त्यांचे अधिकारही सीमित करत नाही. तरीही आपण खरे सांगण्यापासून घाबरतो.

ख्रिश्‍चनिटी आणि इस्लाम हे विस्तारवादी आहेत, प्रचार म्हणजे त्यांच्यासाठी सर्व जग ख्रिश्‍चन किंवा मुस्लीम करणे असा त्याचा अधिकृत अर्थ असतो, ही बाब राज्यघटनाही दुर्लक्षित करते.

त्याच वेळेस पूर्वजांनी इतकी वर्षे जपलेली संस्कृती व त्यातील सण संपवण्याचा का प्रयत्न झाला व तो नेमका कुणी केला, याचा शोध घेणे आपण बंद करतो. ‘सगळे देव एक’ आणि ‘एकच देव’ यातला फरकही कळेनासा होतो. ‘एकच निर्मिक’, ‘एकच देव’ हे म्हणत एकेश्‍वरवादच पोसतो. त्याहीपुढे जाऊन ‘ब्रह्म’ किंवा ‘शुद्ध चैतन्य’ (प्युअर कॉन्शअसनेस) या संकल्पनेला ‘देव’ या संकल्पनेशी जोडतो. हे काम ख्रिश्‍चनिटीने जगभर राजसत्ता वापरून केले, हा इतिहास आहे. गोव्यातही तसेच झाले. तसे करणे तेव्हाही त्यांच्यासाठी पुण्यकर्म होते, आजही आहे व भविष्यातही राहील.

अन्य देवांना भजणे कसे नाहीसे करण्यात आले, निसर्गपूजक व अनेक देवांना भजणारी संस्कृती कशी संपवण्याचा प्रयत्न झाला याचा इतिहास व स्मृती मिटवल्या जात आहेत. आजही ख्रिश्‍चनांमध्ये जुन्या पिढीतले असे लोक आहेत ज्यांना आपण कुंभार होतो, गणेश मूर्ती घडवत होतो, याचे स्मरण आहे. त्यामुळे, ते स्वत: एकेश्‍वरवादी झाले तरी त्यांचा गणेशोत्सवास विरोध नसतो. तेही आनंदाने त्यात सहभागी होतात. त्यात ‘सेक्युलरिजम’ अजिबात नाही. या संस्कृतीशी आपली नाळ जुळलेली आहे, याची जाणीव त्यांना आजही आहे.

‘सामाजिक सलोखा’ बिघडण्याची कृत्रिम भीती घातली जाते, तेव्हा ही नाळच तोडली जाते. आपण या संस्कृतीचेच आहोत, आपल्यावर एकेश्‍वरवादामुळे अन्याय, अत्याचार झाले ही भावना दु:ख देते. द्वेष पसरवत नाही; उलट जवळ आणते. त्यासाठी ख्रिश्‍चन पंथ सोडावा लागत नाही. संस्कृती जपावी लागते.

संस्कृती जपण्याकडे आपण दुर्लक्ष केले. दुर्लक्ष केले तरी परिणाम टळत नाहीत; ते होतच राहतात, होतच राहतील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: