हिंदूंचे देव हे कुणीही यावे काहीही बोलावे याच लायकीचे उरले आहेत. शिवाचे लिंग हे ब्रह्माने तोंडात धरून तोडले व ते जमिनीवर पडले तेव्हापासून शिवलिंग पुजले जाऊ लागले, असे हा मौलाना जर्जिस अन्सारी म्हणतो. ब्रह्माने शिवाचा खतना केला, असे म्हणतो. त्याच्याविरुद्ध काहीच कारवाई होणार नाही. कारण, शिव हा हिंदूंचा देव आहे. (आता तर तो हिंदूंचाही नाही, फक्त शैवांचा किंवा लिंगायतांचा देव आहे, असे मत मांडले जात आहे).
कुराणात असलेलाच संदर्भ कोणतीही अभद्र टिप्पणी न करता नुपूर शर्माने दिला त्यावर गदारोळ माजला. सर्व मुस्लीम देशांनी भारताची कोंडी केली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ असलेली पोस्ट शेअर केली म्हणून कन्हय्यालाल कुमार आणि उमेश कोल्हे यांचे "सर तन से जुदा" करण्यात आले. त्यासाठी न्यायाधीश महोदयांनी नुपूर शर्मालाच जबाबदार (तोंडी निरीक्षणात) धरले होते.
ईशनिंदा झाली म्हणून कुणीही हिंदू मुसलमानांसारखे "सर तन से जुदा" करत नाही. म्हणूनच बहुधा कुणीही उठतो व हिंदू देवांबद्दल काहीही बोलतो. (म्हणजे हिंदूंनी तसे करावे, असे नाही. तेही चुकीचेच आहे) आता तर पुरोगामी, आर्यभटांनी बहुजनांना भाकडकथा सांगून गुलामगिरीत ठेवले म्हणणारे, विचारवंत "शिव ही हिंदूंची देवता नाही" असे म्हणू लागले आहेत. दत्ता नायकांसारखे विचारवंत तर "शंकराच्या लिंगाची पूजा ही मूलत: पुरुषाच्या लिंगाची व स्त्रीच्या योनीची पूजा आहे" असे लिहितात. कुणीही काहीही बोलत नाही.
गणपतीबाबत फुलेंनी जी भाषा वापरली आहे, ती फुल्या देऊन छापावी लागते महाराष्ट्र सरकारला. ते लिखाण "ईशनिंदा" यात येत नाही. जिथे फुले चालतात तिथे दत्ता नायक किंवा हा मौलाना जर्जिस अन्सारी "किस झाड की पत्ती"? हिंदू देवदेवतांविषयी जी भाषा वापरतात त्याविरुद्ध काहीही होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
कारण एकच; हिंदू हा संपण्याच्याच लायकीचा आहे, त्याचे देवही....
1 टिप्पणी:
आपण जे लिहिता, ते पुस्तक रूपात यावे. खूप महत्वाचे
टिप्पणी पोस्ट करा