आयआयटी बॉम्बेमधील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात संबंधित प्राध्यापकावर एस.सी./एस.टी. ॲक्ट लावण्यात आला आहे. आता त्या प्राध्यापकास अटक होईल व निर्दोष सुटेपर्यंत किती वर्षे जातील याचा काही नेम नाही. त्यामुळे, आता सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्याची जात आधी पाहावी, मग त्याच्यावर कारवाई करावी. विद्यार्थी चुकीचे वागला की नाही, हे अजिबात महत्त्वाचे नाही. तो कुठल्या जातीचा आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच जातिगत अत्याचार थांबतील व समता, समानता येईल.
विद्यार्थी जनरल कॅटगरीचा असेल तर त्याला जातीवरून शिवीगाळ केल्यास काहीही होत नाही. ती अॅट्रोसिटी ठरत नाही. पीडित एससीएसटी व आरोपी गैर एससीएसटी असला म्हणजे एससीएसटी कायदा कुठेही लावता येतो. तो लावण्यासाठी साध्या प्राथमिक चौकशीचीही गरज भासत नाही. त्वरित रक्कमही खात्यावर जमा होते. आता जे गैर एससीएसटी प्राध्यापक, शिक्षक आहेत, त्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी. विद्यार्थी, कर्मचारी कसाही वागो, त्याला काहीही न बोलता त्याचे वागणे मुकाटपणे सहन करा. सरकारने एवढे सगळे करूनही आणखी पाचशे वर्षे काही सामाजिक अन्याय संपणार नाही. पाच हजार वर्षांपासून झालेला अन्यायही संपणार नाही. जातिगत उच्चनीचता, जातिभेद संपवण्यासाठी "जात" हाच आधार घ्यावा लागतो, हे तर आपल्या राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे!
त्यामुळे, आता सरकारने अशा सर्व प्रकारच्या कॉलेज, विश्वविद्यालये प्रत्येक राज्यात उभारावीत जेथे कर्मचार्यापासून प्राचार्य, कुलगुरूपर्यंत सर्व एससीएसटी समाजाचेच असतील. एससीएसटींसाठीच असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश हाच निकष ठेवा. नापास वगैरे काही नाही. उणे चाळीस मार्क मिळाले तरी पास. कुठल्याच प्रकारे कुणीच अन्याय करणार नाही. करूच शकणार नाही. त्यामुळे, कॉपी करण्याची, चॅट जीपीटी वापरण्याची गरजच कुणाला पडणार नाही.
उर्वरित शाळा, कॉलेज जनरलसाठी ठेवा. जिथे प्रवेश सर्व प्रकारची फी आकारून, कट ऑफ जास्तीत जास्त ठेवून केवळ जनरल कॅटगरीतल्यांना प्रवेश द्या. प्रायव्हेट कॉलेज हाही एक पर्याय त्यांना खुला ठेवा. जनरल म्हणजे जन्मजात श्रीमंत, सर्व सुखसोयी व शिक्षणाची व्यवस्था असलेला, कोचिंगची फी परवडणारा असतो आणि ऐतिहासिकदृष्ट्या शोषक असतो. त्याच्या पूर्वजांनी केलेल्या या अन्यायाचे सामाजिक न्यायात परिवर्तन जात पाहून नवा अन्याय केल्याशिवाय होणे शक्यच नाही; तेव्हा जात पाहून ठरवा.
असे केल्यास जातिगत अत्याचारामुळे आयआयटीमधील कुठलाही एससीएसटी विद्यार्थी आत्महत्त्या करणार नाही. भारत देशात समता, समानता येईल. भारत एक पुरोगामी, पुढारलेला आणि सर्वाधिक उच्चशिक्षितांचा देश होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा