शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

चर्चसाठी मिलाग्रीस की मिराबाई?

चर्चसाठी मिलाग्रीस की मिराबाई?   हा फोटो पाहिला आणि सेक्युलरिजमच्या या अगाध ज्ञानाने मन भरून आले. लोकश्रद्धा, मान्यता यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. मिलाग्रीस म्हणा किंवा मिराबाई म्हणा ती पावते, ही भाविकांची श्रद्धाच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही.  पण, जे लोक या श्रद्धेला सेक्युलर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तिला सेक्युलर चौकटीत बसवताना थोडा नीट विचार करावा.   बाटवलेल्या मिराबाईलाही ख्रिश्चनांसोबत पुजणे हा हिंदूंचा मोठेपणा आहे, ख्रिश्चनिटीचा नाही. आधी चर्चला अधिकृतपणे हे म्हणू द्या की या सहा बहिणी येशू ख्रिस्ताच्या मावश्या एक भाऊ मामा आहे. मग, या आणि हे सेक्युलर ज्ञान लोकांसमोर पाजळा.   स्वत:वर झालेल्या सांस्कृतिक बलात्कारास सांस्कृतिक संलयन मानणारा हिंदू समाज हा बहुधा जगातला एकमेव समाज असावा.   https://www.facebook.com/share/p/1J7ZMLL6vL/

हा फोटो पाहिला आणि सेक्युलरिजमच्या या अगाध ज्ञानाने मन भरून आले. लोकश्रद्धा, मान्यता यांच्याबद्दल काहीच म्हणणे नाही. मिलाग्रीस म्हणा किंवा मिराबाई म्हणा ती पावते, ही भाविकांची श्रद्धाच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही.  पण, जे लोक या श्रद्धेला सेक्युलर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तिला सेक्युलर चौकटीत बसवताना थोडा नीट विचार करावा. 

म्हापशात जिथे सप्तमातृकांपैकी मिराबाईचे मंदिर होते ते पाडून तिथे चर्च बांधण्यात आली. मिराबाईच्या जागी मिलाग्रीस सायबिणीची (मदर मेरी) स्थापना करण्यात आली. हिंदू भाविकांनी आपली श्रद्धा सोडली नाही, त्यांनी 'मिलाग्रीस' या नावातील 'मिरा' हा शब्द उचलला आणि तिला 'मिराबाई' म्हणून पूजणे सुरूच ठेवले. चर्चच्या नोंदीनुसार, १५९४ मध्ये फ्रान्सिस्कन मिशनरींनी तिथे 'सेंट जेरोम' (St. Jerome) चर्च बांधले. तिथे त्यांनी 'मदर मेरी'ची मूर्ती स्थापन केली, जिला 'मिलाग्रीस सायबीण' म्हटले गेले. चर्चच्या मते, तिथे कोणतीही हिंदू देवता नव्हती, तर त्यांनी एका नवीन कॅथोलिक धर्मस्थळाची स्थापना केली होती. म्हापशातील चर्चचे मूळ नाव पोर्तुगीजमध्ये 'Nossa Senhora de Todos os Bens' (सर्व आशीर्वादांची माता) असे होते. मात्र, तिच्याकडून अनेक चमत्कार (Miracles/Milagres) घडल्याने भाविक तिला 'मिलाग्रीस' म्हणू लागले. 

जरी ती मिलाग्रीस सायबीण झाली, तरी तिने तिच्या बहिणींशी असलेले नाते तोडले नाही. आजही शिरगावची लैराई देवी आपल्या बहिणीसाठी (मिलाग्रीस) फेस्ताच्या दिवशी तेलाचा माठ पाठवते आणि मिलाग्रीस सायबीण जत्रेच्या वेळी लैराईसाठी मोगऱ्याची फुले पाठवते. हे सारे लोकांच्या श्रद्धेतून घडते लोक सेक्युलर आहेत म्हणून नव्हे. 

हे सेक्युलर ऐकायला इतके बरे वाटते ना! काय विचारता! पण एकच गोम आहे, ती कुणी पुढे होऊन जरा निस्तरेल का? 

चर्चच्या (कॅथोलिक चर्च) अधिकृत धर्मशास्त्रात किंवा सिद्धांतांमध्ये (Doctrine) मिलाग्रीस सायबिणीच्या इतर सहा हिंदू बहिणींना धार्मिक मान्यता नाही. चर्चसाठी ती 'अवर लेडी ऑफ मिराकल' (Our Lady of Miracles) म्हणजेच येशू ख्रिस्ताची माता 'मरियम' (Mary) आहे, मिराबाई नाही. चर्चच्या धार्मिक विधींमध्ये तिला 'मिराबाई' असे संबोधले जात नाही. येशू ख्रिस्ताच्या या सहा मावशांना  व एका मामाला चर्चची अधिकृत मान्यता मिळवून देता का? 

बाटवलेल्या मिराबाईलाही ख्रिश्चनांसोबत पुजणे हा हिंदूंचा मोठेपणा आहे, ख्रिश्चनिटीचा नाही. आधी चर्चला अधिकृतपणे हे म्हणू द्या की या सहा बहिणी येशू ख्रिस्ताच्या मावश्या एक भाऊ मामा आहे. मग, या आणि हे सेक्युलर ज्ञान लोकांसमोर पाजळा. 

स्वत:वर झालेल्या सांस्कृतिक बलात्कारास सांस्कृतिक संलयन मानणारा हिंदू समाज हा बहुधा जगातला एकमेव समाज असावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा